Sunday, December 23, 2018

ह.भ.प.वै.विठ्ठलराव दादा दळणर यांच्या पुण्यतिथीनिमित्त साडेतीनशे जणांची आरोग्याची तपासणी

राणीसावरगाव (समाधान जाधव )   
     

  ह.भ.प.वै.विठ्ठलराव दादा दळणर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रविवारी नेत्र तपासणी आणि माधवबाग चे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये साडेतीनशे  नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे य़ा शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
               या शिबिराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाबाजानी दुराणी, माजी आमदार बाबासाहेब पाटील,
धनगर नेते हरिभाऊ शेळके, बाबा नाईक, भाजपचे गणेश हाके, सभापती बनसोडे, सभापती मगर पोळ, संस्थेचे सचिव कृष्णा दळणर आदींची उपस्थिती होती. विठ्ठलराव दादा दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. माधवबाग शिबिरांमध्ये हृदयाचे ठोके, रक्तदाब, छातीची पट्टी, वजन तपासणी, शरीरातील तपासणी  आणि नेत्र तपासणी कऱण्यात आली. या शिबिराला साडेतीनशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. या शिबिरामध्ये माधवबाग येथील डॉ.आशिष सोमाणी, डॉ.प्रशांत कोंडी, डॉ.सतीश बाबर, दामिनी खंदारे, डॉ. विलास वाघमारे, नेत्र तज्ञ डॉ.विजय शेळके, डॉ.ज्योती शेळके आणि उदयगिरी लायन्स क्लबचा सहभाग होता.येथील चाळीस नागरीकांना ऑपरेशनसाठी उदगीरला नेण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी प्रयत्न केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...