Thursday, December 27, 2018

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण निधी चे उद्घाटन

राणीसावरगाव ( वैभव आदोडे ) 
    
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील विद्यार्थी विकास समितीच्या वतीने डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण निधीचे उद्घाटन करण्यात आले आहे.
                                          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर हजर होते, तर व्यासपीठावर आमदार बाबाजानी दुर्रानी, मा.आमदार बाबासाहेब पाटील, भाजपाचे गणेश हाके, कृष्णा दळणर, जि.प.सदस्य माधव जाधव यांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थी सुशील तांबरे, ज्ञानेश्वरी डूमणर, सोनाली पांढरे, अरुणा चव्‍हाण, आणि त्याची ते संगीता बुईनर, समाधान हाके, ऋतुजा पोळ, सोनाली हाके, जयश्री राठोड, राणी नवघरे, छाया नांदुरे, यांचा मान्यवरांनी बक्षीस, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

          वरिष्ठ महाविद्यालयातील नियमित येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक योगदानातून सुरुवात करण्यात आलेली एक अभिनव योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये, महाविद्यालयातील नियमित येणाऱ्या होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे, तर शिक्षकांसाठी आर्थिक मदतीसाठी गरजूवंत विद्यार्थ्यांना प्राचार्यकडे अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जावर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आपत्कालीन परिस्थितीवर पाच हजार रुपयापर्यंत मदत करता येणार आहे. तसेच गरजू विद्यार्थी पास होऊन उच्च शिक्षणासाठी जात असताना सुरुवातीची मदत या निधीतून केली जाणार आहे. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरसिंगदास बंग यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.तुकाराम बोबडे यांनी केले.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...