Monday, December 17, 2018

ह.भ.प.वै. विठ्ठल दळणर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य शिबिर

राणीसावरगाव(मंगेश भालेराव):  
   ह.भ.प.वै.विठ्ठलराव (दादा) दळणर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने २३ डिसेंबर २०१८ रोजी रविवारी सकाळी दहा वाजता महाविद्यालयात राणीसावरगाव येथे नेत्र तपासणी आणि माधवबाग चे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, प्राचार्य डॉ.शिवाजीराव दळणर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
               
  या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शिवाजी दळणर यांची उपस्थिती लाभणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे,आमदार बाबाजानी दुर्राणी,आमदार विजय भांबळे,डॉ.मधुसुदन केंद्रे,मा. आमदार बाबासाहेब पाटील, धनगर नेते हरिभाऊ शेळके संचालक बाबा नाईक, भाजपाचे गणेशराव हाक्के, सभापती मारोतराव बनसोडे, सभापती मगर पोळे, उपसभापती माधवराव शेंडगे, सभापती आत्माराम सोडनर आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमामध्ये संविधान पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हृदयरोग आणि नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये हृदयाचे ठोके, रक्तदाब, छातीची पट्टी, वजन तपासणी, शरीर तापमान तपासणी, वैद्यकीय आहारविषयक सल्ला देण्यात येणार आहे. नेत्र तपासणीसाठी उदयगिरी लायन्स क्लब येथील तज्ज्ञ डॉक्टर आणि परभणी येथील डॉ.विजय शेळके, डॉ.ज्योती शेळके हे येणार आहेत. तर माधवबाग येथील डॉ.आशिष सोमानी, डॉ. प्रशांत कुंडी, डॉ.सतीश घुले, डॉ.विलास वाघमारे, डॉ.सुनीता बाबर, डॉ. कैलास गुरव, दामिनी खंदारे तपासणीसाठी येणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा,असे आव्हान प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर व कृष्णा दळणर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...