Friday, December 28, 2018

इसाद येथे येत्या रविवारी पाणी परिषद

इसाद प्रतिनिधी  (मंगेश भालेराव) 
   
                           पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे इसाद येथे 30 डिसेंबर 2018 रोजी पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांनी दिली.
                             या पाणी परिषदेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या हस्ते होणार आहे तर अध्यक्षस्थानी चे सरपंच सुमन केशव भालेराव यांची उपस्थिती लाभणार आहे. तर उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.बळीराम लहाने, बापू अडकिने, प्राचार्य मधुकर मोरे, जि.प.सदस्य किशनराव भोसले यांची उपस्थिती राहणार आहे. प्रथम सत्रामध्ये मध्ये बापू अडकिने 'मराठवाड्याचे वाळवंटीकरण थांबवता येईल का' तर द्वितीय सत्रात 'पावसाचे पाणी जमिनीत मुरवायचे वायचे सोपे व स्वस्त उपाय' या विषयावर डॉक्टर मधुकर मोरे यांचे भाषण होणार आहे. तर तृतीय सत्रामध्ये कृषी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.उदय खोडके यांचे 'ठिबकचा वापर व देखभाल' तर चतुर्थ सत्रामध्ये महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष दिनकर मोरे यांचे 'मराठवाड्यातील धरणांची स्थिती व पाणीवापराचे कौशल्य' तर शेवटच्या सत्रात बापू अडकिने यांचे 'पाणी प्रश्‍नी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया' यावर चर्चा होणार आहे. तर समारोपाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य किशनराव भोसले यांची उपस्थिती लाभणार आहे. तर प्रमुख उपस्थिती म्हणून अधिकारी डी.एस. फड, प्राचार्य सुपेकर, ग्रामीण विकास अधिकारी एस.बी मुंडे, पं.स.सदस्य नितीन बडे, सरपंच सुमन केशव भालेराव, राजेंद्र भोसले, रामप्रसाद सातपुते, बाळासाहेब भोसले, बाळू पाटील, मुख्याध्यापक नागरगोजे यांची उपस्थिती लाभणार आहे. पाणी परिषदेला सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...