Tuesday, January 1, 2019

पाणी आणि शिक्षण काळाची गरज: कुलगुरू उद्धव भोसले

राणीसावरगाव (पूजा राठोड,रुपाली मेकाले) 
 
इसाद येथे पाणी परिषदेचे  उद्घाटन 
कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी केले.

 नागरिकांनी पावसाची साठवणूक करून योग्य वापर केल्यास आर्थिक प्रश्न सुटतील तर युवकांनी शिक्षण घेतल्यास देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही,असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी मांडले.
                               पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील 'राष्ट्रीय सेवा योजने'च्या वतीने इसाद येथे 'पाणी परिषद' आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.पाणी परिषदेच्या अध्यक्षस्थानी सिद्धत भालेराव यांची उपस्थिती होती.  उद्घाटन  सेवानिवृत्त कृषी अभियंता बापू अडकीने यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर,डॉ. प्रकाश सुर्वे, माजी सैनिक विश्वनाथ सातपुते,उपसरपंच राजेंद्र भोसले,पंचायत समितीचे सदस्य नितीन बडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उद्धवराव सातपुते,अध्यक्ष रामप्रसाद सातपुते,तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब भोसले,बाळू पाटील संस्थेचे
सचिव कृष्णा दळणर आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते बौद्धिक सर्वोत्कृष्ट वैभव आदोडे, श्रमदानातून वैजनाथ हाके, सांस्कृतिक विभागातून सचिन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. भोसले आणि बापू अडकिने यांनी पाणी संदर्भातील महत्त्वाची आवश्यकता कशी आहे, या विषयावर सांगून पाण्याचं महत्त्व  पटवून दिले आहे. पाणी समृद्धीसाठी गावागावात संघटन करण्याची आवश्यकता असून दोन वर्षांमध्ये एक गाव पाणी समृद्ध होऊ शकते. महाराष्ट्रातील कोणतेही गाव पाणी समृद्धीसाठी इच्छुक असल्यास ग्रामपंचायतीचा ठराव महाराष्ट्र सिंचन संयोगाकांकडे द्यावं, त्या गावातील पाणीप्रश्न दोन वर्षांमध्ये सोडण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमांमध्ये प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय पाटील यांनी प्रास्ताविक केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक तुकाराम बोबडे तर आभार डॉ. विश्वनाथ रासवे यानी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल डूमणर, उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकते, गोवर्धन जोगदंड,प्रा.अंगद गडमे आदि प्राध्यापकांनी सहकार्य केले.  या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद आणि ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...