Monday, January 7, 2019

होळकर महाविद्यालयात १३५ विद्यार्थिनीची आरोग्य तपासणी

राणीसावरगाव ( मंगेश भालेराव ) 
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात महिला विकास समितीच्या वतीने  सावित्रीबाई फुले यांच्या १८८ व्या जयंती निमित्य  विद्यार्थिनीच्या आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
                         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकते होते,तर प्रमुख पाहुणे वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती मुंडे होत्या. तसेच या आरोग्य शिबिराच्या तपासणीसाठी आरोग्य सेविका चाटे, कचवे, ज्ञानेश्वर घाटेश्वर, अमित गायकवाड, प्रदीप चापळे, आशिष गायकवाड हे आले होते. यावेळी उपप्रचार्य डॉ.उत्तम देवकते यांनी शरीर निरोगी असेल तर आपण आपले ध्येय सहज गाटू शकतो  असेही त्यांनी सांगितले.यावेळी  डॉ. मुंडे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थीनीना मोलाचे मार्गदर्शन केले.या शिबिरा मध्ये महाविद्यालयातील १३५ विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.यावेळी महिला विकास समितीच्या अध्यक्षा प्रा.डॉ.सिंधुताई खंदारे व प्रा.सारिका केदार याचीही उपस्तीथी होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती कदम यांनी केले,तर आभार अक्षता कदम या विद्यार्थिनीने मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...