Monday, January 7, 2019

बाळशास्त्री जांभेकरांचा आदर्श युवकांनी घ्यावा : डॉ.बालाजी शिंदे

राणीसावरगाव ( मंगेश भालेराव )  
      आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वर्तमानपत्राचे पहिले संपादक होते.तसेच पहिले प्राध्यापक हि होते.त्यांचा आदर्श आजच्या युवापिढीनी घेतला पाहिजे असे आव्हान प्रा.डॉ.बालाजी शिंदे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील वृत्तपत्राविद्या विभागाच्या वतीने दर्पण दिन साजरा करण्यात आला.त्याप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकते यांची उपस्तिथी होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जाभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.डॉ.शिंदे म्हणाले''आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यामुळे मराठी वृत्तपत्राचा विकास झाला.महाराष्ट्र राज्यातून साहित्क,विचारवंत निर्माण झाले आहेत,यातूनच राष्ट्राचा विकास झाला आहे. असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव आदोडे यांनी केले तर आभार कृष्णा सोनसळे यांनी मानले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...