Sunday, June 23, 2019

होळकर महाविद्यालयात योग दिन साजरा

राणीसावरगाव : (मंगेश भालेराव) 
  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयांमध्ये 21 जून 2019 शुक्रवार रोजी सकाळी सहा वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आहे. 
 या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून योग शिक्षक किरण शिवाजी दळणर, प्रकाश नाणाेर यांनी योगाचे महत्त्व आणि गरज या विषयावर मत मांडले.  जगातील 194 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येते हे भारतासाठी अभिमानाची बाब आहे धावपळीच्या युगात योग करणे आवश्यक आहे. योगामुळे आरोग्य मन चांगले असते. प्रत्येक शाळा व
महाविद्यालयांमध्ये योगाचे अभ्यासक्रम राबविण्याची गरज असल्याचे किरण दळणर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार डॉ. विठ्ठल डुमणर यांनी मानले.यावेळी संचालक सोेै. मधुबाला दळणर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,  प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने हजर होते.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...