राणीसावरगाव (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.उत्तम देवकत्ते यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ संतोष हंकारे,डॉ. तुकाराम बोबडे, डॉ. गणेश माने यांची उपस्थिती होती. या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ वसंत सरवदे यांच्यासह मान्यवरांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वसंत सरवदे यांनी केले तर आभार डॉ. अंगद गडमे यांनी मानले.


No comments:
Post a Comment