राणीसावरगाव ( प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील वृत्तपत्रविद्या विभाग आणि समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १७ फेब्रुवारी २०२१ रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. होळकर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष प्रा.डॉ. नारायण कांबळे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव कृष्णा भेैय्या शिवाजीराव दळणर यांची उपस्थिती राहणार आहे. तर बीजभाषक म्हणून गुवाहाटी विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागाचे विभागप्रमुख अंकुरण दत्ता हे करणार आहेत. तर स्वागत अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम देवकत्ते यांची उपस्थिती राहणार आहे. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय शिंदे यांची उपस्थिती राहणार. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामचंद्र भिसे हे सामाजिक बदलातील योगदान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तिसऱ्या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.उत्तम देवकत्ते यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रा.डॉ. राजेंद्र गोणारकर तर महात्मा बसवेश्वरचे प्राचार्य डॉ श्रीकांत गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अंगद गडमे तर अहवाल वाचन डॉ. बालाजी शिंदे हे करतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. तुकाराम बोबडे तर आभार प्रा. डॉ. संतोष हंकारे मानणार आहेत. या कार्यक्रमाला संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजक डॉ.बालाजी शिंदे आणि डॉ. अंगद गडमे यांनी केले आहे.
Monday, February 8, 2021
होळकर महाविद्यालयात १७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय ई चर्चासत्राचे आयोजन
Subscribe to:
Post Comments (Atom)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड
राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...
-
परभणी (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इळेगाव व गुंडेवाडीला जोडणाऱ्या ओ...
-
राणीसावरगाव (प्रतिनिधी): राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून सामाजिक कार्याचा सराव क...
-
परभणी (प्रतिनिधी ): लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. शाळेंची गोष्ट काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी पुण्यश्लो...
No comments:
Post a Comment