Wednesday, October 11, 2023

विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणार -सरपंच जाधव

 राणीसावरगाव (प्रतिनिधी):- शिक्षक जसा विद्यार्थी घडवितो, तसेच विद्यार्थ्यांना भौतिक सुख -सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच सौ बबीता जाधव यांनी केले.
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील नवनिर्वाचित सरपंच सौ. बबीता माऊली जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर तंटामुक्तीचे माऊली जाधव, डॉ. विठ्ठल डूमनर,सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे, क्रीडा संचालक मनोज रेडी, डॉ. माधव शेजुळ आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी शिवाजी दळणर व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सचिव कृष्णा दळणर यांनी राणीसावरगाव येथील नवनिर्वाचित सरपंच बबीता माऊली व माऊली जाधव यांचा सपत्नीक सत्कार केला. त्यानंतर सरपंच जाधव म्हणाल्या, गावातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. वारा -हवा पाणी सुरू झाले की वीज दहा -दहा तास गायब  होत असते, यांची पहिल्यांदा दखल घेऊन गावात नवीन दहा डीपी बसविण्याचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करणार असल्याचे आश्वासन देऊन त्या म्हणाल्या, नागरिकांची मोठी समस्या सुटू शकेल त्यानंतर गावातील मुख्य रस्ता, देवीला जाणारा रस्ता सिमेंटचा बनविण्यासाठी कटिबद्ध आहोत. येत्या दोन वर्षांमध्ये राणीसावरगाव  गावात मोठा बदल दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी  संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर मनाली," राणीसावरगावच्या विकास कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन  त्यांनी दिले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. तुकाराम बोबडे यांनी केले तर आभार डॉ. उत्तम देवकते यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित.


No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...