Thursday, January 25, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

 

राणीसावरगाव (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.         या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक दिगुनाना हाके, संचालक  रंगनाथराव राठोड, प्राचार्य विठ्ठल डुमनर, मुख्याध्यापक किशन रोडे, डॉ. विजयकुमार सोन्नर यांचे उपस्थिती होती. यावेळी कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर, महात्मा गांधी, कर्मयोगी शिवाजीराव दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केबीसी स्पर्धा परीक्षेत प्रथम वैष्णवी भगवान गिरी,द्वितीय प्रतीक्षा बाबुराव वावरे, तृतीय कार्तिक रमेश कोळेकर माध्यमिक गटामध्ये प्रथम तनुजा लक्ष्मण कवडे, द्वितीय दिव्या जयवंत डुमनर, तृतीय माया वेंकटेश सुरनर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बालचित्रकला परीक्षेमध्ये  कुमारी प्रणाली नारायणराव हाके यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर साक्षी नरबा जाधव, समीक्षा काळे, अस्मिता गणेश फुगणर,काजल तुकाराम नरवड,तनुजा लक्ष्मण कवडे, माणिक दळनर, वैष्णवी माणिक दळणर, सृष्टी बाबुराव वावरे यांचे प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व या विषयावर भाषणे झाली. त्यानंतर डॉ. विजयकुमार सोन्नर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व या विषयावर आपलं मत मांडलं. त्यानंतर संस्थेचे सचिव दळणर यांनी महाविद्यालयामध्ये एक फेब्रुवारी 2024 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले आहे,या संमेलनामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. नर्सिंगदास बंग यांनी केले तर आभार डॉ. संतोष हंकारे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...