Wednesday, March 13, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे प्राचार्यपदी डॉ. कांताराव पोले यांची निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी):-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी  डॉ. कांताराव पोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीपत्र संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर व डॉ. विठ्ठल डूमनर यांच्या हस्तेदेण्यात आले. 
    श्रमजीवी समाज कल्याण मंडळ संचलित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील प्राचार्य पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीत अनेकांनी अर्ज केला. त्यापैकी त्यांची निवड नियमानुसार करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील  बाभळगाव  येथील कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालयात 25 वर्षापासून ते कार्यरत होते. राज्यशास्त्र विषयचे गाडे अभ्यासक आहे.जवळपास 40 संशोधन पेपर आहेत. यात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पातळीवरिल समावेश आहे. त्यांची एकूण तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ते आ.अमितभैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केले आहे. त्यांची व्याख्याते म्हणूनही ओळख आहे.  त्यांच्या नियुक्ती बद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.



No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...