राणीसावरगाव (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कांतराव पोले यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेमध्ये एकूण 67 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले त्यापैकी 63 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये प्रथम श्रेणीमध्ये 17 विद्यार्थी पास झाले तर द्वितीय श्रेणीमध्ये 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९६.८२ लागला आहे. महाविद्यालयातील
प्रथम:- विद्यार्थिनी दिपाली संजय सिंह ठाकुर ८२.५० टक्के,
द्वितीय :-वैष्णवी संग्राम बंडगर ८१ टक्के,
तृतीय:- क्रमांक प्रियंका वैजनाथ डोणे 78.33 यांनी गुण संपादन केले. त्या सर्व विद्यार्थिनीचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कांतराव पोले यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. यावेळी प्रा.उद्धव होनमाने, प्रा. प्रकाश चौधरी, प्रा. ज्ञानेश्वर खोमणे, प्रा. पंडित राठोड,प्रा. संदिपान सांगुळे, प्रा. दूलेखाॅ पठाण, प्रा. सोमनाथ अहिरे, प्रा. पंढरीनाथ मरेवाड, प्रा. रमेश नरहिरे, प्रा. बी व्ही राठोडआदींचे उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजी दळणर यांच्यासह कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक वृंदांनी केले आहे.
No comments:
Post a Comment