Friday, August 2, 2024

अण्णाभाऊंमुळेच मानवतावादी साहित्याची निर्मिती - डॉ.संतोष हंकारे


परभणी ( प्रतिनिधी ) दलित, पीडित, शोषीत, वंचित, उपेक्षित अशा समाजजीवनाचे चित्रण करून जी माणसं साहित्याचा कधीच विषय झाली नव्हती अशा माणसांना नायक बनवीले. त्यांच्या समग्र जीवनाचे चित्रण करून त्यांची भुकेची आग स्वाभिमानी पात्राच्या माध्यमातून आपल्या साहित्यातून मांडली आणि मानवतावादी साहित्याची निर्मिती केली. अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून माणसांचा कैवार घेतला असल्याचे प्रतिपादन मराठी विभाग प्रमुख डॉ संतोष हंकारे यांनी आज येथे केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कृष्णा भैय्या दळणर हे उपस्थित होते.तर प्रमुख उपस्थिती प्रा. डॉ.रेणुकादास बोन्नर,राट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी विश्वनाथ रासवे यांची उपस्थिती होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर,लोक शाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या वेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे. या वेळी डॉ.संतोष हंकारे म्हणाले, 

मला रडणे मान्य नसून लढणे मान्य असे म्हणून समग्र सर्वसामान्य माणसांचे दुःख, वेदना आपल्या कथा कादंबरी, लोकनाट्याच्या माध्यमातून त्यांनी  व्यक्त करून  साहित्य काय असते? याची जगाला जाणीव करून दिली.त्यांचे साहित्य देशाच्या सिमा ओलांडून आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहचले  म्हणून अण्णाभाऊ  साठे  हे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवतावादी साहित्याचे निर्माते ठरतात. शेवटी आपल्या गोड आवाजात 'माझी मैना गावावर राहिली' ही अण्णा भाऊ साठे यांची छक्कड सादर केली.

प्रा. डॉ. बोन्नर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावर थोडक्यात प्रकाश टाकला.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विश्वनाथ रासवे यांनी केले. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन प्रा.डॉ. शंकर घाडगे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.बालाजी शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमल विद्यार्थी शिक्षक,कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...