राणीसावरगाव (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने परिसरातील मेंढपाळांना छत्र्या वाटप करण्यात आल्या मागील संपूर्ण आठवडाभर परिसरामध्ये संतत धार पाऊस पडत आहे अशा बरसातीच्या मोसमात परिसरात भटकंती करत बाहेर गावाहून आलेल्या व पावसात भिजणाऱ्या मेंढपाळांना पाहून सामाजिक बांधिलकीचा भाव तयार होऊन माननीय प्राचार्य डॉ कांतराव पोले यांच्या कल्पनेतून पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे, या सामाजिक जाणवेतून त्यांना सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहभागाने काही मदत करता येईल का या जाणिवेतून मेंढपाळांना छत्राचे वाटप करण्याचे ठरले प्रसंगी प्राचार्यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या भटकंती विषयीचा आढावा घेतला. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते म्हणाले,"जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे चार महिने आम्ही बीड, माजलगाव, अंबाजोगाई इत्यादी परिसरामध्ये मेंढ्या चारवत चारवत जातो. आणि सोयाबीनचे पीक झाल्यानंतर परत आमची घर वापसी होते. सध्या कोणत्याही शेतामध्ये व पडीक जमिनीमध्ये राहून आमची व मेंढ्यांची उपजीविका भागवीत असतो, एका कळपामध्ये 200 मेंढ्यांचा सहभाग असतो, असे अनेक कळप आमच्या सोबत आहेत. कळपांची विभागणी केली म्हणजे चारण्यासाठी सोपे जाते, त्यामुळे आम्ही 200 मेंढ्याचं एक कळप करून वेगवेगळ्या परिसरात बीड माजलगाव जालना जिल्ह्यात फिरत असतो, असेही त्यांनी सांगितले.
स्वतः प्राचार्य डॉ कांतराव पोले,डॉ. विश्वनाथ रासवे डॉ बालाजी शिंदे डॉ.संतोष हंकारे, डॉ. सारिका केदार, डॉ. आनंद घन, डॉ.नर्सिंगदास बंग, डॉ. काशिनाथ जाधव, डॉ. तुकाराम बोबडे, डॉ. विजयकुमार सोन्नर, डॉ. सिंधू खंदारे, , प्रा. अभय पाटील, डॉ. गणेश माने, डॉ. अंगद गडमे, डॉ.बालाजी गव्हाळे, डॉ. दिपाली पांडे, डॉ.लक्ष्मी गुहाडे, डॉ. श्रीहरी चव्हाण, प्रा. कल्पना तायवडे, डॉ. शंकर घाडगे, प्रा. उद्धव होनमने, प्रा. एस डी सांगोळे, प्रा. पी. एस. चौधरी, प्रा. दूलेखान पठाण, प्रा. रमेश नरहिरे, प्रा. पी.पी. मोरेवाड, प्रा. एस आर अहिरे, प्रा. डी.एस. खोमणे आदींच्या आर्थिक मदतीतून हा उपक्रम राबवण्यात आला. यातून जमलेल्या रकमेतून परिसरातील मेंढपाळांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले त्यामध्ये प्रतिनिधिक स्वरूपात वैजनाथ नरसिंगराव मिसे, विठ्ठल परसराम तांडकुले,राम परमेश्वर मातरे, पिराजी किशन मीसे, बाबुराव वैजनाथ मिसे या सर्वांना छत्राचे वाटप करण्यात आले


No comments:
Post a Comment