Saturday, August 3, 2024

होळकर महाविद्यालयात एक पेड माॅ के नाम उपक्रम साजरा

राणीसावरगाव (प्रतिनिधी):-  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या परिपत्रकानुसार एक पेड माॅ के नाम उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत  संस्थेचे सचिव कृष्णा भैया दळणर, प्राचार्य डॉ. कांतराव पोले, कार्यक्रमाधिकारी डॉ. विश्वनाथ रासवे, डॉ.बालाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी  महाविद्यालयाच्या परिसरात  स्वयंसेवक व सर्व प्राध्यापक वृंदांच्या हस्ते एक झाड  लावण्यात आले व प्रत्येकाने एकेक झाडाची जबाबदारी घेतली.  या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...