Saturday, August 17, 2024

तरुणांमध्ये नवनिर्मितीची क्षमता विकसित व्हावी - इथोपिया देशाचे जल संधारण आणि ऊर्जा मंत्रालयाचे सल्लागार डॉ.हरिभाऊ वाघमारे यांचे प्रतिपादन

राणीसावरगाव (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास, वाचन आणि ज्ञानसाधना करणे यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. मेहनती शिवाय आयुष्यात दुसरा कोणताच पर्याय असू शकत नाही. तुमच्यामध्ये नवनिर्मिती करण्याची क्षमता विकसित करायचे असेल तर वाचन आणि ज्ञानसाधना करणे अगत्याचे आहे, असे प्रतिपादन इथोपिया  देशाचे जल संधारण आणि ऊर्जा मंत्रालयाचे सल्लागार डॉ.हरिभाऊ वाघमारे यांनी केले.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालय येथील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.तुकाराम बोबडे लिखित तिमिरातुनी तेजाकडे या ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कांतराव पोले यांची उपस्थिती होती तर  प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक तुळशीराम आचणे, विशेष उपस्थिती संस्थेचे सचिव कृष्णा शिवाजीराव दळणर हे होते. डॉ.हरिभाऊ वाघमारे यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी इथोपिया  देशाचे जल संधारण आणि ऊर्जा मंत्रालय सल्लागार हरिभाऊ वाघमारे म्हणाले, विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक, प्राध्यापक यांना त्यांच्या आयुष्यातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करित मिळविलेल्या यशाचे प्रेरक प्रसंग आणि एकंदरीत विद्यार्थी दशेतून पुढे जाण्याचा मार्ग सांगितला. त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्याचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर  माडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे तुळशीराम आचणे  व कृष्णा शिवाजीराव दळणर यांनी सुद्धा पुस्तकाचे अनुषंगाने मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ.कांतराव पोले म्हणाले तिमिरातुन तेजाकडे या शब्दाचा अर्थ अंधारातून उजेडाकडे असा होतो. या पुस्तकाचा फायदा पालका  बरोबर विद्यार्थ्यांनाही होतो.त्यामुळे या पुस्तकाचे वाचन सर्वांनी केले पाहिजे लेखक बोबडे यांचे हे तिसरे अपत्य आहे.येणाऱ्या काळामध्ये अशिच अपत्यांची निर्मिती व्हावी असेही त्यांनी सागितले. 

या वेळी डॉ. नरसिंगदास बंग यांनी लेखक परिचय दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक आणि लेखक मनोगतात प्रा.डॉ.तुकाराम बोबडे यांनी या पुस्तकाच्या लेखनामागील हेतू आणि प्रवास सांगितला. आयुष्यातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आयुष्याच्या ध्येयाकडे पोहचायचे असेल तर त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हेच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे माध्यम आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.शिवशंकर डोईजड यांनी केले. तर आभार डॉ.संतोष हंकारे यांनी मांनले.या कार्यक्रमाला परिसरातील शिक्षकवर्ग महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...