Saturday, August 17, 2024

होळकर महाविद्यालयात पोलीस व सैनिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

राणीसावरगाव (प्रतिनिधी ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पोलीस व सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन पिंपळदरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कांतराव पोले यांची उपस्थिती होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव कृष्णा शिवाजीराव दळणर, संचालक दिगंबरराव हाके, पोलीस उपनिरीक्षक आंधोरीकर, पोलीस उपनिरीक्षक पठाण, मुख्याध्यापक किशन रोडे, डॉ विठ्ठल डुमणर, डॉ रेणुकादास बोन्नर यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी महात्मा गांधी, अहिल्यादेवी होळकर, स्वर्गीय प्राचार्य शिवाजी शिवाजीराव  दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच संगीत विभागाच्या दिपाली पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रूपाली गवळी, किरण राठोड, राजश्री पांचाळ यांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर उद्घाटन प्रसंगी सूर्यवंशी बोलताना म्हणाले ग्रामीण भागात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केले ही अभिमानाची बाब आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही मात्र या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अनेक तरुण पोलीस, सैनिक होऊ शकतात. परिसरात प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्याने तरुणांना चांगला वाव मिळू शकतो. या केंद्रामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही येत राहू, असे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी अंधेरीकर यांनी आपले अनुभव सांगून देशभक्तीपर गीत सादर करून विध्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी  प्राचार्य डॉ कांतराव पोले म्हणाले, परिसरातील विद्यार्थी मेहनती, जिद्दी, चिकाटी आहेत.खरी गुणवत्ताही ग्रामीण भागात असते.  या संधीचा फायदा येथील विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. यातून भविष्यात अनेक पोलीस, सैनिक निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृष्णा शिवाजीराव दळणर म्हणाले, संस्थेचे प्रतिनिधी म्हणून प्रशिक्षण केंद्राला कोणत्याही बाबीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रम प्रसंगी 2024 च्या परभणी पोलीस भरतीत निवड झालेला महाविद्यालयातील विद्यार्थी नितीन साबणे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात स्पर्धा परीक्षेचे समन्वयक  प्रा. डॉ.अंगद गडमे यांनी महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल थोडक्यात सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.दिपाली पांडे यांनी केले तर आभार डॉ.विजयकुमार सोन्नर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक प्रा. विजयकुमार पवळे, प्रा. रामकिशन आव्हाड यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...