परभणी (प्रतिनिधी):- भारत देश स्वातंत्र्य झाला. सर्वत्र तिरंगा फडकला. परंतु मराठवाड्यात मात्र तिरंगा फडकला नाही, इथे सातव्या निजामाचीसत्ता होती. ही सत्ता उलथून लावण्याचे काम अनेक युवकांनी केले आहे,त्याचा केंद्रबिंदू थेरबन( ता हदगाव) हे होतं. अनेक आंदोलनामध्ये स्वतःचा सहभाग होता. मी माझे स्वतःचे अनुभव आपणास सांगत असल्याची माहिती अँड. शिवाजीराव हाके यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कांतराव पोले यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर, संचालक अँड. रंगनाथ राठोड, संचालक दिगंबर हाके,अभियंता सुभाष हाके, मुख्याध्यापक किशन रोडे, केंद्रप्रमुख राठोड, डॉ. विठ्ठल डुमनर, डॉ. गणेश माने आदींची उपस्थिती होती.यावेळी अँड. शिवाजीराव हाके यांच्या हस्ते ध्वजारोहण फडकविण्यात आला तर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा गांधी, स्वामी रामानंद तीर्थ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संस्थापक प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. देशभक्तीपर गीत विद्यार्थी रूपाली गवळी यांनी सादर केले. पाहुण्यांच्या सत्कारानंतर विविध स्पर्धेत विजयी झालेले विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी अँड.शिवाजीराव हाके म्हणाले,"मराठवाडा मुक्ती संग्राम दिनात माझा प्रत्यक्ष सहभाग होता. छोटी -मोठी आंदोलने आमच्या परीने करीत होतो. आमच्या पाठीवर स्वामी रामानंद तीर्थ यांची थाप पडली. नांदेड जिल्ह्यातील थेरबन हे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे केंद्रबिंदू होतं. तेथून पुढील नियोजन केले जात असत. आम्ही निजामाचे कारस्थाने हाणून पाडले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली स्टेट काँग्रेसची स्थापना झाली होती. निजामाच्या विरुद्ध लढायांचा निर्धार झाला. त्याचं मुख्य कार्यालय उंमरखेड येथे उघडण्यात आल होत. मराठवाडा मुक्ती आंदोलन उभारल्यामुळे निजामाला चांगलीच चपराक बसायला सुरुवात झाली. निजामाची वार्ता आमच्यापर्यंत येत होत्या. यादरम्यान जंगल सत्याग्रह, बँक ॲक्शन, इस्लापूर पोलीस ठाण्यावर हल्ला हादी घटनामुळे निजाम घाबरला होता. तिथेच आमचा विजय झाला, असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.गणेश माने, संस्थेचे सचिव कृष्णाभैया दळणर यांची भाषणे झाली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. कांतराव पोले म्हणाले,“ इंग्रजाची सत्ता हिंदुस्थानात होती. हैदराबाद संस्थांचा कारभार निजाम स्वतंत्रपणे पहात होता. निजामाच्या हातात सत्तेची सूत्रे आली तरी इंग्रजांच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हता. निजामानी आपली सत्ता टिकून ठेवण्यासाठी इंग्रजाशी हात मिळवणी केली होती. हैदराबाद संस्थानात हे वेगळेच होते. स्वतंत्र चलन, स्वतंत्र कारभार, स्वतंत्र सेना, स्वतंत्र दळण-वळणाची व्यवस्था उभारली. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकविणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जात होते, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संगीत विभागाच्या डॉ. दिपाली पांडे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक ग्रामस्थ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment