Wednesday, October 16, 2024

होळकर महाविद्यालयात शिष्यवृत्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

परभणी:(प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात शिष्यवृत्ती विभागाच्या वतीने शिष्यवृत्ती कार्यशाळा हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.  या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कांतराव पोले हे होते. तर कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डी. एस. एम. कॉलेज परभणी येथील शिष्यवृत्ती विभागाचे विभाग प्रमुख  अमित सोळंके यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना सोळंके म्हणाले,“विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे, तसेच वेगवेगळ्या शिष्यवृत्तीची माहिती दिली.  शिष्यवृत्ती फॉर्म भरतांना येणाऱ्या अडचणी याविषयी मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. कांतराव पोले यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती फॉर्म भरावे व शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नोडल अधिकारी डॉ अंगद गडमे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मी गुहाडे  यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. सिंधू खंदारे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राणीसावरगाव परिसरातील इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...