पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात मराठी विभागातर्फे (दि.१४/०१/२०२५ ते २८/०१/२०२५) हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला.
दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी मराठी विभाग तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.याकार्यक्रम प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भिंतीपत्रक तयार केले,व मान्यवरांच्या हस्ते भिंती पत्रकाचे विमोचन करण्यात आले. डॉ.श्रीहरी चव्हाण,डॉ.बालाजी शिंदे.डॉ कपिल लामतुरे,यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व समजाऊन सांगितले.या कार्यक्रमासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी मराठी भाषा आणि
मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी या विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ.कांतराव पोले हे उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप करताना ते म्हणाले
की, अता
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इंग्रजी अनिवार्य नसून
मराठी भाषा ही अनिवार्य केली आहे... एक मातृभाषा म्हणून मराठी भाषेचे महत्त्व
त्यांनी प्रतिपादन केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . विठ्ठल डुमनर , प्रा.प्रकाश चौधरी हे उपस्थित होते. प्रा.चौधरी बोलतांना असे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी मराठी भाषा उत्तम रितीने अवगत करून मराठी भाषेमध्ये
असलेल्या अनेक करिअरच्या संधी शोधल्या पाहिजे व मराठी
भाषेत करिअर केले पाहिजे. आज विद्यार्थ्यांसाठी मराठी
भाषेत अनेक करिअरच्या संधी कशा उपलब्ध आहेत याची ही
त्यांनी सविस्तर माहिती दिली. तर प्रमुख उपस्थितीत
प्रा. डॉ.श्रीहरी चव्हाण,डॉ संतोष हंकारे हे
उपस्थित होते. प्रा. डॉ संतोष हंकारे मार्गदर्शन
करतांना मराठी भाषेचे महत्त्व सांगून जगातील सर्व भाषांना सामावून घेणारी मराठी
भाषा आहे म्हणून मराठी भाषेतील शब्दवैभव आपण प्रत्येकांनी जपले पाहिजे असे
सांगितले..
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दुल्लेखान
पठाण यांनी केले तर आभार प्रा. डॉ.श्रीहरी चव्हाण यांनी मान

No comments:
Post a Comment