परभणी (प्रतिनिधी) गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव
ग्रामपंचायतीमधील स्वच्छता दुताचा सत्कार मान्यवरां
च्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना स्वच्छता कामगार म्हणाले गेल्या 30
वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता कामगार म्हणून सेवा करतो.
आणखीन आम्हाला कोणीहि व्यासपीठावर बसविले नाही तसेच सत्कार
केला नाही. महाविद्यालयांनी आमचा सत्कार केल्याबद्दल
आनंद अश्रू आणून स्वच्छता कामगार भारावून गेले होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महात्मा गांधी जयंती निमित्त
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते राणीसावरगाव
ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या स्वच्छता दूतांचा सत्कार
करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रेणुकादास बोनर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख
मार्गदर्शक म्हणून मराठी विभागाचे डॉ. संतोष हंकारे यांची उपस्थिती होती. यावेळी
स्वच्छता दूत म्हणून यज्ञेश्वर श्रीराम जाधव, सुधाकर बेलाजी रायबोले, कांताबाई धोंडीबा मकापल्ले,
अंबुबाई दगडू शिंदे, बालाजी जयराम निलेवाड
यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर, महात्मा गांधी, संस्थेचे
संस्थापक शिवाजीराव दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राणीसावरगावात ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता
कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कामगारांनी बोलताना सांगितले गेल्या 30 वर्षापासून आम्ही गाव स्वच्छतेचे काम करीत आहोत. परिसर स्वच्छ करणे,
ग्रामपंचायत स्वच्छ करणे आदी कामे केली आहेत. आमचे मुले, मुली होळकर महाविद्यालयात शिक्षण घेतात
त्यांच्याकडून महाविद्यालयाची माहिती मिळत होती. मात्र
आज त्याच महाविद्यालयात आमचा सत्कार होत आहे, अशी
प्रतिक्रिया व्यक्त करीत भारावून गेले होते. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले
होते.
यावेळी डॉ संतोष हंकारे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश
टाकला तर कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य डॉ. रेणुकादास बोनर यांनी केला. या
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थी रोशन घाटके,आभार
प्रा.डॉ. बालाजी शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक वृंद, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment