Wednesday, February 14, 2018

डॉ.शिवाजी दळणर यांना बँरिस्टर टी.के शेंडगे पुरस्कार प्रदान

राणीसावरगाव (सुशील तांबरे): 
    

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर यांना “बँरिस्टर टी.के. शेंडगे ज्येष्ठ  समाजसेवक पुरस्कार” नुकताच लातूर येथील आदिवासी धनगर साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. 

लातूर येथे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनामध्ये विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या संमेलनामध्ये सर्व उकृष्ठ समजला जाणारा आणि धनगर साहित्यातील मानाचा हा पुरस्कार असून त्यांची निवड समिती मार्फत करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी राज्यातून अनेक माण्यवरांची नावे होती. मात्र एकमताने डॉ.शिवाजी दळणर यांची निवड केली. त्यांच्या निवडीबद्दल उद्घाटक ना.ध.महानौर,साहित्यिक डॉ.कांचा इलय्या,अध्यक्ष संगीता धायगुडे, माजी अध्यक्ष संजय सोनवणी, जयसिंघ तात्या शेंडगे, अँड. अण्णाराव पाटील, डॉ.उत्तम देवकते यांनी कौतुक केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...