Wednesday, August 29, 2018

स्वतःला सिद्ध करण्यासाठी खेळ महत्वाचा : चौधरी

राणीसावरगाव (सोनी पवार)   

 स्वतःला सिद्ध करण्यासाठी खेळ खेळला पाहिजे, कोणाला हरविण्यासाठी खेळ खेळला जाऊ नये, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक नंदलाल चौधरी यांनी केले.
      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागातर्फे  राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राणीसावरगावचे पोलीस उपनिरीक्षक नंदलाल चौधरी, मराठवाडा ग्रामीण बँकेचे सहायक व्यवस्थापक मुरलीधर  पुरी, क्रीडा संचालक डॉ.विठ्ठल डूमणर यांची उपस्तिथी होती.
        यावेळी मान्यवरांनी मेजर ध्यानचंद व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते कब्बडी खेळाडू विद्यार्थी परमेश्वर सुभाष चव्हाण, अंकुश रामराव चव्हाण, अनिल शेषेराव राठोड, आनंद उद्धव जाधव, संदीप मारोती बुधवारे, धर्मराज विठ्ठल नामपले, ईश्वर साहेबराव चव्हाण, संतोष ज्ञानदेव जाधव, करण चंद्रकांत माने, दीपक रोहिदास जाधव, प्रा. तुकाराम बोबडे, प्रा.दुलेखान पठाण, प्रा.होनमने, आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी चौधरी व डॉ.देवकते, डॉ.डूमणर यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थीनी पूजा राठोड हिने केले तर आभार डॉ.नरसिंगदास बंग यांनी मानले. या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...