Tuesday, October 3, 2023

विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळातर्फे धरणे आंदोलन


गंगाखेड (प्रतिनिधी):-  महाराष्ट्र शासनाने दिनांक 6 सप्टेंबर व 31 सप्टेंबर 2023 रोजी काढलेला जीआर रद्द करण्यात यावा, अशा विविध मागण्यासाठी महात्मा गांधी जयंती दिनापासून गंगाखेड तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ गंगाखेड तालुक्याच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरु राहणार आहे.

 विविध मागण्याचे निवेदन गंगाखेड तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी तहसीलदार यांचे प्रतिनिधीनी  जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन पाठवु, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ गंगाखेड तालुका अध्यक्ष कृष्णाभैया शिवाजीराव दळणर, सचिव रामराजे फड, कार्याध्यक्ष शंकरराव वाघमारे आदींची उपस्थिती होती.

  शासनाने नवीन शाळा वाटप  धोरण आल्याशिवाय नवीन शाळा वाटप बंद करावे,नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याआधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी निर्धारणाचे निकष नव्याने ठरविण्यात यावे, गुणवत्ता पूर्ण  शिक्षणावर होणारा खर्च मर्यादित न ठेवता राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के करण्यात यावा, कंत्राटी भरती पूर्णपणे बंद करावी, सर्व थकीत अनुदान वेतनेतर  अनुदान पूर्णपणे अदा करण्यात यावी, पवित्र पोर्टलमार्फत होणारी शिक्षक भरती ही विविध न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार करण्यात यावी, शिक्षण संस्थांच्या नियुक्तीच्या हक्कात  आडकाठी आणू नये, सर्व विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान द्यावे, यापूर्वी विनाअनुदानावरून शंभर टक्के  अनुदानावर आलेल्या शाळांनाही वितरित अनुदान प्रदान करण्यात यावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध नव्याने करून रिक्त पदाची भरती चतुर्थ कर्मचाऱ्यासहित करण्यात यावी, राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांना केंद्र शासनाचे सर्व शिक्षण अभियानाचे अनुदान प्राप्त व्हावे, कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या नियुक्तीचा शासन आदेश ताबडतोब रद्द करण्यात यावा, अशा विविध मागण्यासाठी मुख्याध्यापक संघटना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा शिक्षक संघटना आदी संघटनेच्या वतीने गंगाखेड तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी संस्थाचालक व सर्व संघटनेचे अधिकारी,पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...