नांदेड ( विशेष प्रतिनिधी):- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित "मेरी माटी मेरा देश" उपक्रम व उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी व सवय सेवक पुरस्कार वितरण आणि पुढील वार्षिक कार्यक्रम नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
महाविद्यालयातील वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने "कर्मयोगिनी" या
मासिक अंकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह
भिसेन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे राज्य सल्लागार डॉ. राजेश पांडे, संचालक डॉ. मल्लिकाअर्जुन करजगी, व्यवस्थापक परिषद
सदस्य संतराम मुंडे, डॉ. प्रशांत केसकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, प्राचार्य संजय चाकणे, राष्ट्रीय सेवा योजना
कार्यक्रम अधिकारी डॉ. विश्वनाथ रासवे, कर्मयोगिनीचे मुख्य
संपादक डॉ. बालाजी शिंदे,युनिसेफच्या रशिया यांच्या हस्ते
करण्यात आले.
यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. त्यांनी
कर्मयोगिनी अंकाबद्दल थोडक्यात मते मांडली. नवनियुक्त जिल्हा समन्वयक नांदेड
जिल्हा डॉ. अमोल काळे,
लातूर जिल्हा डॉ. केशव अलगुले, हिंगोली जिल्हा
डॉ. सचिन हटकर, परभणी जिल्हा डॉक्टर अरुण पडघन यांचे निवड
झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला डॉ. गोकुळदास गायकवाड, डॉ.
डी डी पवार, डॉ. नागेश कांबळे, डॉ.
शिवराज रोकडे डॉ. नारायण कांबळे, श्री बर्गे आदींची उपस्थिती
होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. करजगी यांनी केले तर सूत्रसंचलन डॉ. अलगुले,
डॉ. अरुण पडघन यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार डॉ. भागवत
पस्तापुरे, डॉ. तुकाराम फिसफीसे यांनी मानले. या
कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक व चारही जिल्ह्यातील महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा
योजना कार्यक्रम अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील
वृत्तपत्रविद्या विभागातर्फे "कर्मयोगिनी" अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या
हस्ते झाले ही अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे, ग्रामीण भागातही
वृत्तपत्रासारखे वृत्तपत्र प्रकाशित होऊ शकते हे कुतूहलाची बाब असल्याचे मत
मान्यवरांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment