परभणी (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा कर्मयोगी प्राचार्य डॉ शिवाजीराव विठ्ठलराव दळणर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात कर्मयोगी प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कांतराव पोले यांची उपस्थिती होती तर अभिवादन व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्रीमती मधुमाला दळणर, संस्थेचे सचिव कृष्णाभैया दळणर, संचालक दिगंबर हाके, डॉ. संतोष हंकारे, डॉ. तुकाराम बोबडे यांची उपस्थिती होती. मान्यवरासह सर्व कर्मचारी वर्गांनी डॉ. शिवाजीराव दळणर यांच्या स्मृतिस्थळांचे दर्शन करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. संतोष हंकारे यांनी कर्मयोगी शिवाजीराव दळणर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. दळणर सरांनी परिसरात शिक्षणाचे महत्त्व ओळखून राणीसावरगाव परीसरात शिक्षणसंस्था उभारली. त्यामुळे अनेक तरुण - तरुणींना शिक्षण घेता आले. शिक्षणाचा फायदा होऊन त्यांच्या जीवनात बदल घडून आला. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी विद्यार्थी नोकरी करीत आहेत. येथील शिक्षण घेणाऱ्यामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीची संख्या जास्त आहे. डॉ. शिवाजीराव दळणर यांच्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनींना शिक्षण घेऊन अनेक क्षेत्रात मोठे योगदान देता आले आहे,असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर संस्थेचे सचिव कृष्णाभैय्या दळणर यांनी डॉ. शिवाजीराव दळणर यांच्या पालकत्वावर मत मांडले तर प्राचार्य डॉ. कांतराव पोले यांनी आपले अनुभव सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार डॉ. तुकाराम बोबडे यांनी मानले.
त्यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव कृष्णाभैया दळणर, मुख्याध्यापक किशन रोडे, शिक्षक बने यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरासह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment