राणीसावरगाव (शिवकन्या पौळ, अंकिता पौळ)
जगामध्ये जर तुम्हाला उठून दिसायचे असेल तर ज्ञान हाच देव मानून कर्मावर विश्वास ठेवा. मोबाईल संस्कृती गाठून ग्रंथाचे सामर्थ्य ओळखून वाचन संस्कृती जोपासावी तिच खरी तुमची ओळख आहे. असे मत प्रा.डाॅ. धनजकर यांनी व्यक्त केले.पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या मराठी वाडःमय अभ्यास मंडळ उदघाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले की आजच्या विद्यार्थ्यांना मलालाचा आदर्श घेतला पाहिजे,कारण कोणताही माणूस हा जन्म:च मोठा होत नसतो, तो जातीने, धर्माने, पंथाने मोठा न होता वाचनाने मोठा होत असतो.
जागामध्ये ज्ञानाच्या हजारो विहिरी भरलेल्या आहेत, त्या विहिरीतील ज्ञान आपण मिळवले पाहिजे. पुस्तकाच्या वाचनाबरोबर समाजाचे वाचनही तुम्हाला करता आले पाहिजे. प्रयत्न जर अथक असतील तर यश तुमच्या पायाशी लोळन घेते. त्यासाठी आपन वाचन केले पाहिजे. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डाॅ. उत्तम देवकत्ते हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून डाॅ. राजेश धनजकर तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा.डाॅ. संतोष हंकारे प्रा.डाॅ. श्रीहरी चव्हाण हे उपस्थित होते. याप्रसंगी वाडःमय मंडळाचे प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वाडःमय मंडळाचे अध्यक्ष सोना मासोळे,शिवकन्या पौळ, हनुमंत दळणर यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून कु. ऋतुजा पवार, कु. सुषमिता देशमुख, कु. संघर्षा गायकवाड, भागवत इमडे, युवराज वडारे, पुजा पौळ,रूपाली कासले, कु.प्रणाली कदम यांची निवड करण्यात आली. प्रमुख पाहुणच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'माय मराठी' या भिंतीपत्रकाचे विमोचन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. श्रीहरी चव्हाण यांनी केले तर आभार डाॅ. संतोष हंकारे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृत्तपत्रविद्या विभागाचे विभागप्रमुख प्रा. डाॅ. बालाजी शिंदे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख प्रा. गोवर्धन जोगदंड यांनी परिश्रम घेतले.