Thursday, November 29, 2018

प्रा.अंगद गडमे यांना पीएच.डी.

राणीसावरगाव (सुनील रायबोले)     
   
  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्राध्यापक अंगद मनोहर गडमे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथून यांनी समाजशास्त्र विषयामध्ये पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी डॉ.कृष्णा शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली "ग्रामीण दारिद्र्य निर्मूलनामध्ये शासकीय योजनांची भूमिका एक सामाजिक विश्लेषण" या विषयावर विद्यापीठात प्रबंध सादर केला होता. विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुल मध्ये बहिस्थ परीक्षक म्हणून अमरावती विद्यापीठाचे डॉ. किशोर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मौखिक परीक्षा घेण्यात आली. त्यांचे कौतुक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकते समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.नारायण कांबळे दयानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य गायकवाड डॉ.बालाजी शिंदे,डॉ.संतोष हंकारे,डॉ.श्रीहरी चव्हाण व सहकारी यांनी केले.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...