Saturday, August 19, 2023

होळकर महाविद्यालयात विविध कार्यक्रमासह स्वातंत्र दिन साजरा




















राणीसावरगाव (प्रतिनिधी);- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात  स्वातंत्र दिंनानिमित्य राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त्य ‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत ध्वजारोहण व राष्ट्रगान कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर हे होते.तर व्यासपीठावर प्र,प्राचार्य विठ्ठल डूमणर,मुख्याध्यापक किशन रोडे, संचालक अॅड. रंगनाथ राठोड, दिगंबर हाके,माजी सैनिक सखाराम बापूराव जाधव, विलास गित्ते, राज्याभाऊ सालमोटे,कल्याण जाधवयांची उपस्तिथी होती. महात्मा गांधी,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,शिवाजीराव दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर यांच्या करण्यात आले तर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनी वैष्णवी दळणर,शिवानी दुधाटे,हर्षदा हाके,आयशा तांबोळी,तनुजा कवडे,संगित विभागाच्या प्रमुख दिपाली पांडे यांनीही देशभक्तीपर गित सादर केले.  संस्थेचे सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांच्या हस्ते ध्वज्यारोहन करण्यात आले.
त्या नंतर मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिक सखाराम बापूराव जाधव,विलास रामराव गित्ते व स्वातंत्र सैनिक कुटुबातील व्यक्ती राज्याभाऊ अर्जुन सालमोठे ,कल्याण जाधव यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
     महाविद्यालयातील शिक्षक विनायक दालपे यांचा मुलगा ऋषिकेश दालपे यांची लंडनला उच्च शिक्षणासाठी निवड झात्याबद्दल पालकासह सत्कार करण्यात आला.  त्याच बरोबर क्रोस कंट्री१२ कि मी धावण्याच्या स्पर्धा विजेते खेळाडू सचिन रोहिदास पवार,मयूर हनुमत मंजणर,विशाल रामेश्वर गाडगे,राजू साहेबराव तनपुरे,ऋषिकेश सुनील बांगर,लक्ष्मन सुखदेव दाभाडे यांचाही सत्कार मान्यवरांच्या वतीने करण्यार आला. या वेळी कृष्णाभैया शिवाजीराव दळणर यांनी  अध्यक्ष समारोप केला. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डॉ नरसिंगदास बंग यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विश्वनाथ रासवे यांनी केले.आभार डॉ बालाजी शिंदे यांनी मानले.  या कार्यक्रमाला डॉ उत्तमराव देवकत्ते, डॉ.संतोष हंकारे ,डॉ सारिका केदारे,डॉ ए एल घन,डॉ व्हि पी सरवदे, डॉ के के जाधव,डॉ टी बी बोबडे,डॉ आर वाय बोन्नर,प्रा एस एन फुटके,डॉ व्हि बी सोन्नर,डॉ एस पी खंदारे, प्रा ए एस पाटील,डॉ जि जी माने,डॉ ए एम गडमे,डॉ बि एम गव्हाळे,यु जी व्हनमाने, एस डी सांगूले,पि एच चौधरी,डी आय पठाण,आर जी नरहरी,पि पी मारेवाड,पि आर राठोड,एस आर अहिरे,बी व्हि राठोड,डी एस खोमणे, डॉ एस डी घाडगे,डॉ एस डी चव्हाण,डॉ के जी तायडे, डॉ कपिल लामतुरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



            

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...