Thursday, August 17, 2023

होळकर महाविद्यालयात शिलाफलकांचे उद्घाटन

 राणीसावरगाव (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 'मेरी माटी मेरा देश' अंतर्गत 'माती को नमन  वीरो का सन्मान या शिलाफलकांचे उद्घाटन माजी सैनिकांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले आहे. 
    यावेळी संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर, प्रभारी प्राचार्य डॉ. विठ्ठल डुमनर, कार्यक्रम अधिकारी डॉ. विश्वनाथ रासवे,माजी सैनिक सखाराम बापूराव जाधव गुंडेवाडी, विलास रामराव गीते, सैनिक अंकुश ठाकूर, स्वातंत्र्यसैनिक कुटुंबातील राजेभाऊ अर्जुन सालमोठे, कल्याण जाधव, मुख्याध्यापक किशनराव रोडे, संचालक रंगनाथ राठोड, संचालक दिगंबर हाके यांच्या हस्ते या उपक्रमांतर्गत  शिलाफलकांचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...